एक हृदयस्पर्शी प्रेमकथा.. आज पहाट जरा मस्तच भासतहोती, त्यालाही जराशी धुंदी चढली होती. बाहेर पाउस रिमझिम पडतहोता, वाराही कुंद जाहला होता... तो आज खूप खुश होता,अगदी मनातूनभारला होता. कारणही तसच होतं, आजतिच्या अन त्याच्या लग्नाला एक वर्षझालं होत... ती तर त्याहुनही खुश होती,अगदी मनाच्या हिंदोळ्यावरझोके घेत होती लग्नाला एक वर्ष तर झालंचहोत, पण ती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती... सकाळी नाश्ता चालला होता, तिने आजमोगरा माळला होता आणि सुवासमंद दरवळतहोता. तिने आज त्याचे आवडते बटाटेपोहेकेले होते, तोही प्रत्येक घासाबरोबरतिला डोळे मिटकावूनदाद देत होता... त्याच्या आईलाही हे कळत होत,ती पण मुद्दाम मधेच खाकरून त्यांचा नजरभंग करत होती. आणि तो अगदीच प्रेमाने तिच्या हातावर मधेचएखादी थाप मारत होता... संध्याकाळी आईकडून त्याने खास"परमिशन"घेतली होती,आईनेही अगदी हसूनती दिली होती. "इविनिंग शो" ची दोन तिकिटे काढली होती, मगघरी तिघांचा डिनर असा मस्त बेत ठरला होता.दोघे भलतेच खुश होते, आई देखील त्यात सामीलझाली होती. दृष्ट लागू नयेअसा त्यांचा संसार होता, पणसंसाराच कायत्याला कधी कधी प्रेमाचीचदृष्टलागते... त्याने पैसे वाचवून हफ्त्यानेतिच्यासाठी स्कुटी बुक केली होती, तिला ऑफिसला जायला गर्दीतत्रास होतो ना. तीही काही कमी नव्हती पाच महिने पैसे वाचवूनएक हिऱ्याची अंगठी घेतली होती, जणू संध्याकाळी ती घेऊनएका हिरयावर दुसर्या हिरयाचा कळस चढवणार होती... ऑफिस मधून संध्याकाळी एकमेकांनाफोन केले, तिनेत्याला त्यांच्या सोनाराच्या दुकानासमोरभेटायला बोलावले. त्याला कळून चुकलं होतंकाहीतरी महागडी भेटवस्तूमिळणार, तो हि नवीन कोरी करकरीतस्कुटी घेऊन तिला भेटायला निघाला होता... तो तिथे पोचला त्यानेस्कुटी लपवून पार्क केली, म्हटलं "सरप्राईज" देईन. ती त्याच्या आधीच तिथेपोचली होती, आणि हिऱ्याची सुरेखअंगठी आपल्याच मुठीतलपवली होती... तो क्षण आला दोघांची नजरानजरझाली, त्याने तिला दुरूनच हात केला. तिनेही त्याला हात हलवूनप्रतिसाद दिला, दोघे एक-एक पाऊल पुढे सरकू लागले... ती तर दोन-दोन पावलेउडी मारून चालत होती,तो आपल्या नेहमीच्या हास्यात तिच्यावरची नजर ढळू देत नव्हता. दोघांच्याही मनात एक पूर्ण वर्ष तरळत होतं,आयुष्य भराची साथ हेच फक्तदिसत होतं... ती पुढे आली दोघांमध्ये फक्तवीस-एक पावलेच राहिली, ती वीस पावले पण आज कोसभरवाटतहोती. पण अचानक तो मटकनखाली बसला, काय होतंय हेच त्याला कळत नव्हतं... त्याचा कानाचे पडदे फाटलेहोते? नाही नाही धरणीकंपचझाला होता. कि आभाळ फाटलं वीज पडली त्याला काही काही उमजत नव्हतं,नाही नाही हा तर बॉम्ब- स्फोट होता... क्षणभरात तो भानावर आला,सगळी कडे फक्त धूर कल्लोळ आगीचे लोटआणि अस्ताव्यस्तभंग झालेली माणसे. त्याला त्याची "ती" कुठेचदिसत नव्हती, त्याची भिरभिरलेली नजर फक्त तिलाच शोधतहोती... आणि त्याला ती दिसली ती तीचहोती का? साडी फाटलेली, अंग रक्ताने माखलेलं. तिचं पूर्ण सौंदर्य रक्ताने लपलेलं होतं, अंग-अंग छिन्न-विच्छिन्न झालंहोतं... तो धावला जीवाच्या आकांतानेधावला, त्याने तिचं डोकं मांडीवर घेतलं. तिला जोरजोरात हाकमारली, अजून थोडी आशा दिसत होती तिने डोळे उघडले... त्याचे अश्रू तिच्या गालावरपडत होते, तेच अश्रू तिचा अबोलचेहरा दाखवत रक्त दूर सारतहोते. तो काही बोलणार इतक्यात तिने मुठउघडली,आणि ती हिऱ्याची अंगठी जणूकाही खुलून हसली... तिने मुठ उघडली, त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तिच्या मुठीत ती चमकदार अंगठी लकाकत होती, जणू घे मला बाहुपाशात खुणावत होती... तो रडत होता थांब थांब म्हणत होता, पणतिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर होतं ते फक्त हलकसं स्मित,कदाचित मरणापर्यंत साथ का हीच? तिने ती अंगठी हळूच त्याच्या हातावर ठेवली,त्याने तीचा हात घट्टधरला होता. हळूच तिची मुठ बंद झाली फक्त"टेककेअर" म्हणून तिचे नाजूक ओठ बंद झाले, पणतिच्या चेहऱ्यावरच ते जीवघेण"स्माईल" आजही तसच होतं तसच होतं..
0 likes
0 shares