एकटा होतो मी माझ्याच विश्वात, विचार करत होतो आपल्याच मनात, आलीस मला हाथ दिला तू , जगण्यासाठी मला नवा विश्वास दिला तू , पण अजून हि नाही कळले कि माझ्यासाठी आहेस तरी कोण तू ? रोज स्वप्नात तुझाच चेहरा , कोवळ्या मनाला आता तुझाच आसरा , डोळ्यासमोर प्रत्येक क्षणी दिसते तू , क्षणो क्षणी मला इतकी आठवतेस तू , पण अजून हि नाही कळले कि माझ्यासाठी आहेस तरी कोण तू ? कविता करायची कधीच सोडून दिली होती, शब्दांची हि माझ्यावर नाराजी झाली होती, मला नव्याने शब्द सुचवणारी तू , प्रत्येक कवितेची सुरुवात तू शेवटही तू, पण अजून हि नाही कळले कि माझ्यासाठी आहेस तरी कोण तू ? मला जिवनाची नवी वाट दाखवली, भटक्या मनाला नवी दिशा दिली, माझ्या सोबत सावलीसारखी राहणारी तू , प्रत्येक वेळी आधार देणारी तू, पण अजून हि नाही कळले कि माझ्यासाठी आहेस तरी कोण तू ?
0 likes
0 shares