Back to feed
I
Ira Malhotra Motivation · Marathi · Motivation

एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन. तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन. ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मीच जिंकेन . कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो , पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते . शर्यत सुरु झाली कुत्रा जोरात धाऊ लागला. पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली , असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते तात्पर्य काय १.आपल्याना विश्वासात घ्या २.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन द्या ३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील ४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा ⭐जे मित्र आपली हॉटेल ची बिले भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे,⭐ ⭐तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून!⭐ ⭐जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!⭐ ⭐जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!⭐ ⭐जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपल मानतात म्हणुन!⭐ ⭐जे खुप पोस्ट्स पाठवतात ते रिकामटेकडे असतात म्हणून नव्हे, तर तुम्ही सतत त्यांच्या संपर्कात रहाव म्हणुन . . !⭐

250 likes 76 shares
WhatsApp