एकदा गाठ माझी त्या आकाशाशी व्हावी.... मग मैत्री त्याची माझी चंद्रासही सलावी..... एकदा गाठ माझी........ मैफिलीत चांदण्यांच्या मी भैरवी आळवावी सुमधुर सुरांनी माझ्या ती रात्र तरूण व्हावी... एकदा गाठ माझी....... ओढून रजई ढगांची मी स्वप्न तुझी बघावी पहाट ही गुलाबी काळोखास त्या लाजावी..... एकदा गाठ माझी......... असे असावे उद्याचे आयुष्य माझे भावी संदेश पोहचवा रे हा माझ्या प्रियकराच्या गावी..... एकदा गाठ माझी...... एकदा गाठ माझी......💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares