Back to feed
I
Ira Pawar Love · Marathi · Life

एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ...!! दुःखात असताना ही, कधी खोटं खोटं हसून बघ..... •💝💝💝💝💝💝💝💝 स्वप्नांच्या जगात हरवताना, कधी स्वतःला सावरुन बघ..... मनातल्या अबोल भावना, कधी शब्दात मांडून बघ..... •💝💝💝💝💝💝💝 सुखाचे क्षण अनुभवताना, कधी दुःखाचे ओझे वाहून बघ..... प्रेमाची अपेक्षा ठेवताना, कधी दुस-यांना प्रेम वाटून बघ..... •💝💝💝💝💝💝💝💝💝 विरहाचे गीत गाताना, कधी एकटेपणा सोसून बघ..... आपल्यांची आठवण काढताना, कधी मलाही आठवून बघ......💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp