Back to feed
J
Jiya Malhotra Love · Marathi · Life

एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ...!! एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, दुःखात असताना ही, कधी खोटं खोटं हसून बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, स्वप्नांच्या जगात हरवताना, कधी स्वतःला सावरुन बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, मनातल्या अबोल भावना, कधी शब्दात मांडून बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, सुखाचे क्षण अनुभवताना, कधी दुःखाचे ओझे वाहून बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, प्रेमाची अपेक्षा ठेवताना, कधी दुस-यांना प्रेम वाटून बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, विरहाचे गीत गाताना, कधी एकटेपणा सोसून बघ..... एकदा माझ्यासारखं, कधी तू ही जगून बघ, आपल्यांची आठवण काढताना, कधी मलाही आठवून बघ...!!

0 likes 0 shares
WhatsApp