एक.सुंदर कविता.. नक्की वाचा.... 🌻"आपलच माणूस लागत... 👉🏽 आनंदात असताना सुखात भागीदार कुणीही चालतं, 👍🏼 पण दु:खात रडताना अश्रू पुसायला आपलंच माणूस लागतं ... 👉🏽 घोळक्यात असताना दंगामस्ती करायला कुणीही चालतं.. 👍🏼 पण एकांतात असताना गुपित सांगायला आपलंच माणूस लागतं ... 👉🏽 वरवरच्या जखमांना फुंकर घालायला कुणीही चालतं ... 👍🏼 पण मनात खोलवर रुतलेल्या जखमांना फूंकर घालायला आपलंच माणूस लागतं ... 👉🏽 काळाच्या अंधारात विरणार्या आठवणींसाठी कुणीही चालतं ... 👍🏼 पण मनाच्या कप्प्यात घर करण्यासाठी आपलंच माणूस लागतं ... 👉🏽 कायमचंच रुसण्यासाठी अबोला धरण्यासाठी कुणीही चालतं ... 👍🏼 पण आपल्यावर रुसण्यासाठी रुसवा आपला काढण्यासाठी आपलंच माणूस लागतं ... 👉🏽 यशाच्या शिखरावर बेहोश होण्यासाठी कुणीही चालतं.., 👍🏼 पण अपयशाच्या दरीत तोल सावरण्यासाठी आपलंच माणूस लागतं ... "आपलंच माणूस लागतं..."
N
Nisha Iyer
Heartbreak · Marathi · Heartbreak
213 likes
58 shares