ओठातल्या शब्दांनी लिहिले तुला काव्यार्थामध्ये मी रंगवले तुला काळजातल्या वेदनेने स्मरले तुला खरच का त्या आठवांनी घेरले तुला जखमा भरण्यासाठी नेमले तुला जेव्हा खपल्यांनी कवटाळले तुला तेव्हा हृदय स्पंदनांनी वाचले तुला जेव्हा तुझ्या कपटाने लपेटले तुला मी तर मनापासून स्वीकारले तुला का जाणो नात्याने झिडकारले तुला माझ्या अंताने अखेर पाहिले तुला तुझ्या वाटेने जेव्हा ठोकरले तुला माझ्या आसवांनी भिजवले तुला जेव्हा तुझ्या प्रतारणेने पोळले तुला माझे असणे नसणे कळले का तुला खरेच सांग विरहाने छळले का तुला...😪
0 likes
0 shares