का कोण जाणे पण, लक्ष्मण रेषेबाहेरचे जग, मोहक भासू लागले आहे आताशा, कुठुनशी एक जीवघेणी साद ऐकु येते आहे.. माझेच पाऊल माझे ऐकेलसे वाटेनासे झाले आहे, आताशा.. नात्या-गोत्यांचे, संस्कार-संसाराचे वारूळ तोडून, मुंगी झेपावू पहाते आहे आकाशात.. हा देह खुळावलाय पुरा, सांगु राहीलाय पुन्हा पुन्हा, तुझ्या कवेत बेभान व्हावे, तुझीच कविता गात.. सारे मनाचे खेळ आहेत, मी मनालाच समजावते आहे, मनातल्या मनात, तरी पुन्हा देहभान विसरत आहे, ठाऊक आहे माझ्या हाते माझीच नाळ कापते आहे.. पाय घसरेल, बहुदा.. वाटु लागले आहे आताशा... का कोण जाणे पण, लक्ष्मण रेषेबाहेरचे जग, मोहक भासू लागले आहे आताशा...
0 likes
0 shares