Back to feed
V
Vivaan Mishra Love · Marathi · Romantic

काजळखणी ब्रह्मांड-उदरी प्रसवे अवचित धूमकेतू, अज्ञाताच्या प्रवाहपंथी वाटेवर पेरीत प्रकाशतंतू...... क्षणिक दर्शन,यात्री एकटा सोबतीस ना कुणी ऋतू गूढ ,रम्य अन कुतुहलाच्या वलयामध्ये चकती जंतू...... निळसर भाळी स्वप्नांच्या नभी चमकता दवबिंदू , क्षितीजावरती तारांगणी नितांत सुंदर ,क्षण आगंतू...... अशुभ लक्षणी , जनी वदंता अगम्य चक्री,वसतो किंतु , दिव्य शलाका ,तेज पिसारा निसर्ग किमया हीच परंतु...... शापित यक्षा कुणी स्मरावे असा विरागी ,एकाकी तू , मिळो तुलाही सखी चांदणी म्हणेल का रे कुणी तथास्तु?

258 likes 21 shares
WhatsApp