Back to feed
A
Anika Kapoor Love · Marathi · Romantic

काटे अलगद बाजूला काढत माझ्या ओंजळीतली फुलं दुसर्या ओंजळीत सोपवताना, माझा हातच होतोय फुलांचा सुगंधानं दरवळणारा, अन् मखमली स्पर्शाचा... काही ओंजळी ठेवतायत माझी फुलं जपून तळहातांच्या रेषांसारखी ! काहींना पत्ताच नसतो की ही फुलं आहेत ! जपून ठेवली पाहिजेत याचा ! माझ्या फुलांनी मात्र सुगंधित केलंय त्यांच्याही ओंजळीला... त्यांच्याही नकळत... जेव्हा अशा अनेक ओंजळी लाभतील, तिथं विसावतील फुलं, तिसर्या ओंजळीत जाण्यासाठी... तेव्हा बनेल गाणं ! सुगंधानं दरवळणारं... खोलखोल झिरपणारं... आणि आकाशाला पोहोचणारं...

0 likes 0 shares
WhatsApp