कडक पुणेरी सूचना - 💥कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात. उगीच लांबड लावू नये 💥ऊगाच Greeting Cards पाठवण्यापेक्षा भेट वस्तू पाठवाव्या. ऐपत नसेल तर मोती साबण पाठवला तरी चालेल. दिवाळी नंतर ही वापरता येतो. 💥अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये. सरळ मुद्यावर यावे. 💥फटाके न उडविण्याविषयी आमचे प्रबोधन करू नये.आम्ही ते रस्त्यावरच ऊडवणार. 💥दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये. आम्हाला माहीत आहे. 💥ऊगाच मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका. आम्हाला कौतूक नाही. 💥ऊगाच ईटरनेट वरून डाऊनलोड केलेले रांगोळीचे फोटो स्वत: काढलेल्या रांगोळीचे म्हणून टाकू नये.आम्ही पण ईंटरनेट वापरतो. 💥सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका. आम्ही तो वेगळा करतो. 💥फराळास बोलवायचेच असल्यास आगाऊ सूचना द्यावी. फराळास स्वत: केलेलेच पदार्थ द्यावे. दुसरीकडून आलेले न आवडलेले प्रकार खपवू नये. 💥मागील वर्षीच्या त्याच त्याच पोस्ट परत चालणार नाहीत.... 😃😂😃
202 likes
16 shares