कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही, कोणाला निमंत्रण नाही, कोणत्याही सोशल मिडीयावर जाहीरात नाही, कुठलीच भंपकबाजी नाही, कोणालाही कसलही प्रलोभन नाही, कोणाचा कोणावर राग रूसवा नाही, कोण खायला घालेल की नाही, ते पण माहीत नाही, आज मिळालय उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही, खिशात एक रूपयाची पण गरज नाही , तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्ण पार पडतो , कुठलही गालबोट लागत नाही , इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही , म्हणून कोठेच गर्वाचा/अहंकाराचा लवलेशही नाही. दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा, डोळ्याचं पारण फेडणारा. ऊर भरून आणणारा सोहळा, श्रीमंतच नाही.... गर्भश्रीमंत सोहळा ..तोही खर्या अर्थाने... अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती ... आणि हा सगळा अट्टाहास... कशासाठी... तर फक्त..... मुख दर्शन व्हावे आता... तु सकळ जनांचा दाता.... घे कुशीत या माऊली... तुझ्या पायरी.... ठेवतो माथा ..... ज्ञानोबा माऊली तुकाराम...!!!
139 likes
1 shares