"किती अंधारून आलंय, अज्ञाताच्या भीतीनं, मन कासावीसलंय, तुझं स्वागत कसं करू?" भवताल कुजबुजतोय... "हतबल नाही व्हायचं, अंधाराच्या साम्राज्यात प्रकाशगाणं नक्की गायचं. आपल्या परीनं जमेल तितकं करत राहायचं." आशेची ज्योत म्हणतेय... आपल्या आश्वासक कृतीनं भवताल उजळून जावा, मानवतेच्या सुगंधानं आसमंत दरवळून यावा... याच सदिच्छा प्रकाशपर्वाच्या निमित्तानं... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares