Back to feed
S
Shaurya Sharma Love · Marathi · Romantic

किती सांग शब्दांत मी व्यक्त व्हावे कळावे तुला सर्व मौनातुनी रिते मी करावे तुझे स्पर्श सारे उगा त्रास देतात नयनातुनी जणू यौवनाला फुटे पालवी अन खुलू लागल्या बघ सुगंधी कळ्या तुझ्या अत्तराची कुपी सापडावी चढावी नशा धुंद श्वासातुनी ऋतू सर्व ल्यावे तुझ्या मीलनाचे फुलावे सदा मी तुझ्या अंगणी मनी मोहरावे पुरे धुंद व्हावे कधी जाग यावी न स्वप्नातुनी आता दृढ व्हावे मनातील नाते , चढावी तनावर नशा रोज ही पुरे भान हरपून तुजला पहावे पियावे तुझे रूप अधरातुनी असे सोहळे नित्य रंगून जावे , मनी रेखते चित्र रेखीव मी कळावे तुला रे अता अर्थ सारे हृदय सांगते रोज स्पर्शातुनी

0 likes 0 shares
WhatsApp