Back to feed
M
Myra Kapoor Love · Marathi · Life

किती सोपं असतं ना, "विसरून जा " म्हणायला खरं तर काहीच अर्थ नसतो, तिच्याशिवाय जगण्याला..... किती सहज बोलतात बोलणारे, "आपल्याकडे मुली साठ , एक गेली-एकोणसाठ " हा तर त्यांना न कळलेला प्रेम-पाठ... तिच्यासारख्या असतीलही लाखो , कदाचित या जगात , पण तिचे वेगळे स्थान आहे, त्या एक लाखांत... प्रेम नसेलही माझ्याविषयी, कदाचित तिच्या मनात, पण मला आनंद वाटतो, तिच्या आनंदात...... बहुतेक हाच आनंद मला, दु:ख विसरायला भाग पाडत असावा, अन ह्या एकाकीपणात , पुन्हा एकदा, तिच्या आठवणी मनात घेतात विसावा....

0 likes 0 shares
WhatsApp