कितीही पाहिलं तुला तरी समाधान कसं ते होतच नाही उलगडायला हवं एकेक कोडं पण नवीन कोड सरतंच नाही घेऊया म्हटलं एकदा पाहून तृप्ती कशी ती होतच नाही तासन तासाच्या भेटीनंतर ओझरती झलक सोडवत नाही तुझ्यातच उरून राहते शेवटी भान कळीकाळाचं उरत नाही तुझाच गंध सतत शेजारी जमान्याची फिकीर करत नाही
0 likes
0 shares