“कधी भेटुया ?” ह्या तुझ्या एका प्रश्नाने बदलतो अवघा ऋतू मनाची पानगळ थांबते देहाला फुटतो मोहाचा बहर कोरड्या ठक्क गात्रांतून दुथडी भरून वाहू लागते पुष्ट, मत्त वळसेदार नदी पाहता पाहता वय एक होऊन जाते तुझ्या माझ्या पाण्याचे अती चिवट लव्हाळ्यांनाही वेध लागतात वाहून जाण्याचे आणि असं बरंच काही सांगता येईल भेटेपर्यंत,भेटताना,भेटल्यानंतर पण तूर्तास “कधी भेटुया” ह्या रेशमी प्रश्नाला एकच टोकदार उत्तर ये आता खूप दिवस झाले उसवले नाही माझे तुझे अस्तर ... ❤️💓❣️❤️❣️❤️❣️❣️❤️❣️❤️❣️❣️❤️❣️❣️❤️❣️
211 likes
4 shares