Back to feed
R
Rohan Verma Heartbreak · Marathi · Heartbreak

कधी वाटते विचारावे तुला का येतेस पुन्हा आठवण बनून कधीतरी सावरल्यावर का जातेस मग पुन्हा एकटे सोडून जगू देना मला माझा विश्वात रडू देना मला तुझा विरहात जळू दे होरपळू दे जीव माझा पण मांडू दे मला माझा मनाची व्यथा मिळू दे मला एकांत जगू दे मला निवांत होवू दे आग आग जीवाची गुरफटू दे श्वास श्वासात व्यापून उरतात तुझा आठवणी डोळे भरतात तुझा आठवणी आस भास श्वास तुझा उरात निजतात तुझा आठवणी लिहू दे मला कविता पुन्हा छळू नकोस तू मला रचू दे शब्द नको आवरूस तू मला सजवेन अजून भावनांच्या ओळी पण ……? वाचताना माझी कविता फक्त एकदा मिठीत घे मला फक्त एकदा मिठीत घे मला …… !!!!💔💔💔

95 likes 79 shares
WhatsApp