Back to feed
N
Nikhil Joshi Love · Marathi · Life

कधीकधी वाटतं मनातलं सर्व सांगावं , पण कोणाला आणि कसं सांगावं हे मात्र कळत नाही , मग ठरवलं जिच्यासाठी आहे मनात जे , ते तिलाच सांगावं , पण सांगावं तरी कसं तिला ती तर आता सोबत नाही , मग आठवलं तिचा फोटो तरी आहे खूप जुना पहिल्या भेटीचा हो तिच्या फोटोशी बोलून मन मोकळं करावं , तिच्यासाठी मी जो त्रास सहन केला , चुकी नसतानाही , मी जी शिक्षा भोगली ते तिच्या फोटोला सांगावं , काय चुकलं माझं काहीच नाही हे तिला पटवून द्यावं , तुम्हाला हा माझा थोडा वेडेपणा च वाटेल की फोटो ला बोलून , फोटो ला सांगून तिला प्रत्यक्षात थोडीच कळणार आहे , पण खरं सांगू का प्रेम झालं ना तेव्हा च तो खरा वेडा होऊन जातो , मग ती व्यक्ती सोबत असो किंवा नसो पण सतत सोबत असल्याचा भास हाच तर खय्रा प्रेमाची आस असते , मग माझा हा वेडेपणा पण काहीच नाही , ती सोबत नाही पण तिची प्रतिमा आहे , मग तिच्या प्रतिमेशी बोलून मन मोकळं करतो मग माझं चुकलं तरी काय , मनाला एक समाधान भेटतं ती नाही पण तिची प्रतिमा तर आहे बोलण्या - साठी , एवढं ही खूप असतं मनाला आवर घालण्यासाठी , समजून सांगण्यासाठी !....

0 likes 0 shares
WhatsApp