कपाळावर सुक्ष्मशा आठीवरून घरंगळते अस्वस्थता मनाच्या खोल कुठल्याशा पायरीवरुन अलगद वर येते अस्वस्थता... पापण्यांच्या कडांवर मणामणाच्या ओझ्यात अडकते अस्वस्थता कललेल्या मानेत, जडावलेल्या अंगात अवघडते अस्वस्थता... हनुवटीखाली घामाच्या बिंदूत चमचमते अस्वस्थता बधीर होऊन तड लागलेल्या पायात शिष्ट रूतते अस्वस्थता... बदलणा-या कुशीत डोकावून पुन्हा परतते अस्वस्थता अपरात्री येरझा-यात पावलाशी घुटमळते अस्वस्थता... गडद झोप वटवाघळाच्या पंखात देऊन टाकते अस्वस्थता श्वासांच्या वेगात वर खाली दोलायमान होते अस्वस्थता...
0 likes
0 shares