Back to feed
V
Vihaan Bagale Heartbreak · Marathi · Heartbreak

किमया.. आभाळाला कुणी दिला रे सोन्याचा हा रंग ? कुणी मोजुनी सोडत आहे नदीमधूनि तरंग ? उंच कड्यांवर उभा ओणवा पाऊस त्याला शिक्षा ! तरी तयाच्या ओल्या ओठी गुणगुणतात अभंग ? मातीमध्ये कुणी सांडले मृदगंधाचे अत्तर ? राग कुणावर काढुन बसले इथले काळे पथ्थर ? रोज किती मी मोजू सांगा ? गणितच माझे कच्चे ! झाडावर येतात कुठुन पाने सतराशे सत्तर ?? किती बडबड्या नद्या येथल्या माझ्याहुनही बाई ओरडत कधी असेल का त्यांनाही त्यांची आई ? कुठली शर्यत जिंकायाची असते या वाऱ्याला ? भिंगरपायी धावत असतो, कसली इतकी घाई ?? या रस्त्याचा सदरा शिवला कुठल्या गं शिंप्याने ? वळणांची शोभा वाढवली खड्ड्यांच्या बटणाने काय दरारा असतो त्याचा, किती कौतुके सांगू ! स्वागत करते इथली फांदी हिरव्याश्या मुजऱ्याने...

209 likes 35 shares
WhatsApp