।।काय माहित कशी असेल ती ।। सुंदर_नाजूक उठून दिसेल ती , गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती , कारण नसताना खोटीच रुसेल ती , काय माहित कशी असेल ती ! एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती , नाही तर कदाचित सर्वात धाकटी असेल ती , संसार कसा सांभाळेल ती , काय माहित कशी असेल ती !! फ्याशन करील की संस्कृती पळेल ती , परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती , संसाराचा पसारा कसा आवरेल ती , काय माहित कशी असेल ती !!! थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती , काय माहित कशी असेल ती !!!! एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती , आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती , दु:खात ही न तुटता हसेल का ती , काय माहित कशी असेल ती.....
0 likes
0 shares