काय माहीत कशी असेल ती ! सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळ पडून हसेल ती, कारण नसताना खोटीच रुसेल ती, काय माहीत कशी असेल ती ! एकुलती एक सर्वात थोरली असेल ती, नाहीतर कदाचित धाकटि असेल ती, संसार कसा सांभाळेल ती, काय माहीत कशी असेल ती ! फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती, परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती, संसाराचा पसारा कसा आवरेल ती, काय माहीत कशी असेल ती ! थोडी नखरेल असेल का ती, हुशार समजूतदार सुगरण असेल का ती, एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती, काय माहीत कशी असेल ती ! एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती, आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती, दुखात ही न तुटता हसेल का ती,
0 likes
0 shares