Back to feed
V
Vihaan Joshi Love · Marathi · Romantic

काल मला भेटायला आली होती ती मला पाहुन गोड हसली ती, तिला समोर पाहुन माझ्या डोळ्यात अश्रूच आले, कारण खूप दिवसानंतर माझ्या समोर उभी होती ती... माझ्याशी हितगुज करायला माझ्याबाजूला बसली ती, आमचे प्रेमाचे किस्से आठवत मला अलगद स्पर्श करायची ती... मला तिच्यासोबत फिरायला घेऊन गेली ती, समुद्रकिनारी माझ्या कुशीत डोक ठेवून खूप गप्पा सांगत होती ती... फिरून आल्यावर खूप थकली होती ती, मला तुझ्याच मिठीत झोपायचय म्हणून मला आग्रह करत होती ती, रात्रभर माझ्याच मिठीत झोपून होती ती... तिच हे निरागस प्रेम पाहून हरवलो होतो तिच्यात मी, मला वाटल होत आता आयुष्यभरासाठी माझी झाली ती... पण... सकाळी उठल्यावर कळाल माझ्या स्वप्नात आली होती ती.....!!!

0 likes 0 shares
WhatsApp