कॉलेजात रोज बघत होतो घोळक्यात तुला हसताना मीच माझा हरवत होतो तुला तसे पहाताना रेशमी मोकळे केस तुझे चेहेरा तुझा झाकत होते पण त्यामुळे गोड हसु मला पहाताच येत नव्हते खरंतर त्यावेळी मला त्या केसांचा राग येत होता तुझ्याशी बोलायचा मग बहाणा काही हवा होता आलो तडक तुझ्याकडे विचारलं फ्रेंडशिप करशील का? तरी मनात उगाच शंका नाही सुध्दा म्हणशील का? मी येताच तुझ्याकडे तू हसून नावासकट ओळखलसं इतकं मधाळ हास्य तुझं की नव्याने प्रेमात पाडलसं
0 likes
0 shares