Back to feed
D
Diya Deshmukh Love · Marathi · Romantic

कविता... तुला टाळण्याच्या प्रयत्नात वेडी अशी गुंतली मोहपाशी तुझ्या जश्या सावळा मेघ स्पर्शून खाली धरेवर तुटाव्यात लाखो विजा... तुला टाळण्याच्या प्रयत्नात वेडी तुझी होत गेली अशी दरक्षणी जशी कि ऋतूंच्या प्रदेशात येऊन मिसळे कुणी श्रावणी पाहुणी... तुझ्या टाळण्याच्या प्रयत्नात वेडी तुझे नाव घेते घडी दर घडी जशी कि तुझी वाट टाळून पुन्हा तुझ्यापास परतायची भाबडी... तुला टाळण्याच्या प्रयत्नात वेडी तुझ्यावर किती अन किती भाळली जशी की कुण्या गंधवेड्या कळीने फुलाची छबी रोज न्याहाळली... तुला टाळण्याच्या प्रयत्नात वेडी किती दूर गेली तुझ्यापासूनी जशी कि कुणी बाहुली दुःख लपवून हासे किती गोड डोळ्यातूनी

7 likes 85 shares
WhatsApp