कविता - चिंतन ( स्वरचित कविता ) नाही पाहिजे फुकाचं साहेब आमच्या क�ष्टाचंच आम्हाला द्या एक कर्जमाफी दिल्यापेक्षा शेतमालास आमच्या भाव द्या चिंता नका करू आमची तुमचाच विचार तुम्ही करा खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आता नवनवीन फंडे वापरा नोटबंदिच्या वेळी भ्रष्टाचाराची घेतली होती का कोणी गॅरंटी कर्ज माफिच्या नावाने कशाला पाहिजे वारंटी. दरसाल ह्या निसर्गाचा कोप आमच्यावर होतो शेतकरी बंधु आमचा नाही त तुमच्या भरोश्यावर नसतो . कितीही असलं कर्ज तरी नडलो नसतो मुळीच आम्ही दर महिन्याले पगाराची असती जर आम्हास हमी. येऊन पहा कधी साहेब आमच्या गरिबाच्या �झोपडीत असह्य बापाची संवेदना उतरू द्या तुमच्या खोपडीत. सोन्यासारखा संसार सोडून उगीच कोणी मरत नसतं तुमच्या इतकं पण थोडं अपेक्षेचे ओझं उरी असतं. विरोधी पक्षातले म्हणतात म्हणून आश्वासन नका देऊ कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची नुसती फिरकी नका हो घेऊ ...
A
Anaya Kumar
Heartbreak · Marathi · Heartbreak
250 likes
10 shares