Back to feed
M
Meera Malhotra Love · Marathi · Life

कविता म्हणजे भावनांचा बंध , कुणाचा छंद तर कुणाचा आनंद ! व्यक्त करी प्रेमाचा अर्थ , कविता ! हे प्रेमीचं सामर्थ्य . कविता हे फुल , कविता हे अत्तर . ज्यातून दरवळे गंध . कविता कुणाचा छंद, तर कुणाचा आनंद ... कविता कागदावर बनत नसते, मनी शब्दांची माळ जुळत असते. ज्यास न कळे, तो मंद ! अन कळे तो होई धुंद . कविता म्हणजे.. आयुष्य, दु:ख आणि आनंद! आमची कविता आणि तुमचं प्रेम, जरासं वेगळ आणि खूपसं सेम. कुणाचं दु:ख, कुणाचा आनंद. कविता म्हणजे भावनांचा बंध ! न चुके कविता , न चुके प्रेम. चुकतो तो फक्त ... नेम! कारण, . . . "प्रेम आणि कवितेत कुणाचा नेम सांगता येत नाही!"

0 likes 0 shares
WhatsApp