Back to feed
A
Aditya Bose Love · Marathi · Romantic

कविता लिहिणे पिले मांजराची पिले कोंबडीची कविता कुणाची घडो यावी ||१ शब्द इटूकले शब्द पिटुकले यमकी रचले काम व्हावे ||२ असल्या खेळात फावल्या वेळात गाणे गळ्यात येते कधी ||३ असे वेळ तर सोडा नाहीतर प्रेम शब्दावर फक्त करा ||४ व्यक्ती नुसार कविता होणार भाव उमटणार ज्याचा त्याचा ||५ तर मग चला शब्द उधळा कविता उजळा पुन्हापुन्हा || ६ कविता लिहिणे असते जगणे दवात भिजणे सकाळच्या ||७

175 likes 34 shares
WhatsApp