Back to feed
A
Atharv Gupta Love · Marathi · Romantic

कवितेचा उन्हाळा देशील का सरी तू, या अंतरास माझ्या तृष्णा उधाण आली, मातीस भेग माझ्या. जिव्हा करी लसासा, कंठास शोष आला शब्दास शुष्क माझ्या, अाभासी कोंब आला. मोर उदास झाले, चातक पाहि वाट सागर शांत आहे, किनारी रिक्त लाट. सृजनांचे झरे ते, फुटूदे एक वार प्रतिभेस लुटू दे, कविता एक वार.

0 likes 0 shares
WhatsApp