Back to feed
I
Ishaan Deshmukh Love · Marathi · Romantic

कशी अचानक कुठूनी नकळे कधी अवतरली राहिली येउनी रुधयी कविता दिसते मज दश दिशांना भासते समिपच माझ्या स्पर्शते हवेतून मजला कविता वाटते येउनी शेजारी बसलीशी खेटून मजसी परी बघता नसे तिथे ती कविता झोपही न येते मजला गुणगुणते ती कारण माझ्या कानात निशब्द शब्दांच्या कविता लोक म्हणती झाला वेडा दिसते म्हणे कारण याला अन बोलतेही कानी याच्या कविता परी येता अव्यक्त रुपात मी नटवितो तिला शब्दांत मग दिसते मजला सुंदर कविता कधी चंद्राहूनही शीतळ कधी सुर्याहूनही प्रखर कधी वर्याहूनही अवखळ कविता कधी बरसे अश्रू बनुनी कधी हसते निर्झर बनुनी दाखवी मनाच्या लहरी कविता न भेटली जरी दिवसांत मज अंतरी भीती सतत गेलीका सोडून मजला कविता? मग होऊनी वेडापिसा मी विनवतो शब्दांना जा शोधून माझी आणा कविता ती येते मग झुळूक बनुनी कुजबुजते निशब्द कानी अन सजते शब्द बनुनी 😘

0 likes 0 shares
WhatsApp