कशी आज तू गे उभी पाठमोरी जशी देवतेची असे सावली तुझी आज आली छबी या महाली जशी ती मनाच्या वसे राउळी तुझा भास होतो जसा भोवताली तसे श्वास माझे उरी दाटती जशी रात येई छुप्या पावलांनी तशी आर्त होते तुझी याद ही जशी रोहिणी गे नभाच्या किनारी तशी आज शोभा असे अंगणी खुळा तोच भुंगा अश्या शामपारी असावीस तू मोगर्याची कळी तुझी पैंजणे वाजली आज दारी तशी काळजाची थबकली गती कसे काय जाणू कसे काय बोलू असावे तुझ्या गूज लपले मनी
0 likes
0 shares