Back to feed
D
Dhruv Iyer Love · Marathi · Romantic

कशी समजूत घालू, वेड्या या मनाला...! तू नाही आता जवळ, सांगू मी कुणाला...!! दिवसातून कितेकदा, पाहतो तपासून मोबाइला...! नाही येणार तुझा आता फोन, सांग वेड्या या मनाला...!! कसे विसरावे गोडवा, तुझ्या त्या मिठीतला...! अजूनही तुझी आस आहे, वेड्या या मनाला...!! आस तुझ्या प्रीतीची, लागली आता जीवाला...! अजून किती घायाळ करशिल, वेड्या या मनाला...!! जीव झाला वेडापिसा, तुला एकदा पहायला...! काहीच कसे कळेना, वेड्या या मनाला...!! तुझीच आस लागली, वेड्या या मनाला...! आता तरी नजरेस पड, या क्षणाला...!!

0 likes 0 shares
WhatsApp