Back to feed
R
Rohan Pawar Love · Marathi · Romantic

कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, नको ते प्रयत्न केले मी, पण तुला विसरताच आले नाही..... कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, न आठवावं मी तुला, पण आठवल्याशिवाय करमत नाही..... कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, न रडावं तुझ्यासाठी, पण रडल्याशिवाय झोपच येत नाही..... कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, न झुरावं तुझ्यासाठी, पण झुरल्याशिवाय राहवत नाही..... कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, न गुंताव तुझ्यात, पण गुंता काही केल्या सुटत नाही..... कसं विसरु मी तुला, माझे मलाच कळत नाही, न फसावं प्रेम जाळ्यात तुझ्या, पण एकदा फसल्यावर माघार घेता येत नाही..... कारण प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही..... प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही.....

0 likes 0 shares
WhatsApp