खुप खुप शोधले, का न मला भेटले... आई तुझ्यातले देवपण..खरच, का न मला दिसले..... होतो जेंव्हा लहान तेंव्हा, अंगा खांद्यावरून खेळवायचीस.... खरच...किती गोड आवाजात, तू मला बोलवायचिस.... होवू नये रंग काळा , म्हणून किती वेळा धुवायाचिस.... होतो तुझ कळीजच जणू, किती जिव लावयचिस.... लागु नये नजर कोणाची, म्हणून नको नको ते करायचिस..... माझ्याही नकळत मला आई, तू काळा टिका लावयचिस... खरच खुप खुप शोधले मी, का न मला भेटले....... आई तुझ्याताले देवपण खरच, का न मला दिसले......
0 likes
0 shares