Back to feed
N
Navya Chauhan Love · Marathi · Romantic

खूप दिवसांनी आज हात पसरले होते... तुला मिठीत घ्यायला... पण नेहमीप्रमाणे तुला ती पसरलेली झोळी वाटली... आणि नेहमीप्रमाणेच तू माझ्याकडे तुच्छतेने बघत कुठलंच दान त्यात न टाकता मला वळसा घालून चालता झालास... तेव्हापासून त्याच ठिकाणी तुझ्या वाटेत दगड होऊन मी शोधतेय, गतकाळातले तुझे माझ्या कवेतले पुसट होत जाणारे ठसे....... आता फक्त शेवटची एकच इच्छा.. चुकून कधी जर वाटलंच तुला पुन्हा माझ्या मिठीत शिरावंसं.. तर माझे हात त्याच पूर्वीच्या वेडाने उठावेत, तुला जवळ घ्यायला....... बस्स्....बाकी काहीच नाही...........

0 likes 0 shares
WhatsApp