♥♥ खेळ ♥♥ खेळायचं होत तर आधीच सांगायचंस .. नियमांचा खुलासा आधीच करायचास .. मी नसता केला आटापिटा मग खेळाला हृद्य आणायचा .. स्वतःच्या मनाप्रमाणे नियम बदललेस ,वर राग हि तुला खेळात हरल्याचा .. ठाऊक आहे आता मोडणारच तू डाव .. मी जिंकायला लागले आता घालणारच तू घाव.. अशी कशी रे तुझी अमानुष वृत्ती.. खेळण्यासाठी मग मला हाक मारायचीचन्हवती .. मी बसले होते खिडकीतून पाहत सार काही .. तुलाच खोडील सवय मला स्वस्थ बसून द्यायचं नाही .. तू नसताना इतक अस्वस्थ करशील अस वाटल न्हवत .. या पूर्वी काळीज हि इतक कधी दाटल न्हवत .. कस विनवू तुला कापतायत माझे श्वास.. ऐकशील का मला कशी करू मी सुरवात .. आता आली आहे माझी हाक मारायची वेळ.. तूच ठरव सगळे नियम फक्त माझ्या सोबत खेळ ..♥♥
0 likes
0 shares