*खास मुलींच्या पप्पांसाठी* *माझी मुलगी मोठी झाली.* *एकेदिवशी सहज म्हणाली,* *" पप्पा मी कधी तुम्हाला रडवलय का ?"* *मी म्हटलं,"कारे पिलू आसं का विचारतेस ?"* *ती :- काय नाही असच* *मी :- नीट आठवत नाही ,* *पण एकदा* *ती :- "कधी ?" तिनं* *अधिरतेनं विचारलं.* *मी म्हणालो," तु एक वर्षाची* *असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस.* *तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस.* *जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.* *मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.* *मला बघायची होती तुझी निवड.* *तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे* *बघत होतीस* *आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.* *तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि *क्षणार्धात तु त्या सगळ्या* *वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.* *माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो.* *ती पहिली वेळ होती जेव्हा तु मला रडवलसं.!!!* *खास मुलींच्या पप्पांसाठी* ☺☺😘💝
56 likes
59 shares