खास मुलांनसाठी..!" मुलींनी तर हे नक्कीच वाचावे... . मी सातवीत होतो त्यावेळी तुझं नवीन अॅडमिशन आमच्या वर्गात झालं. तु पुढच्या बँचवर बसायचीस. बघता क्षणीच मला तु आवडली होतीस. . कितीतरी वेळा मी तुझ्याकडे चोरुन बघायचो. मी एकटाच नाही तर वर्गातली सर्वच मुले तुझ्याकडे बघायचे. . आपलं नेहमी बोलणं व्हायचं. तुझ्या त्या सुंदर ओठांमधुन बाहेर पडणारे शब्द मला खुपच आवडायचे. . एक दिवस तुला प्रपोज करायचं ठरवुन आलो पण, वर्गाँसमोर एकट्याला तु कानाखाली लावलीस. नंतर कळलं की त्याने तुला "i love u" म्हटलं होतं. मग भीतीने तुला प्रपोजच केलं नाही. . . आपण आठवीमध्ये गेलो... एक दिवस तु घरी नोट्स मागायला आलीस. घरी कोणी नव्हतं तेव्हा मला वाटलं, मी तुला सांगुन टाकावं सगळं. पण नोट्स देताना तुझ्या हाताचा स्पर्श झाला आणि सगळंच विसरुन गेलो. तु ही मागे वळुन माझ्याकडे पाहात निघुन गेलीस. . तुझा स्पर्श झालेल्या हाताला मी आठ दिवस रुमाल बांधला होता, कारण... तो स्पर्श तसाच राहावा म्हणुन... . आईच्या विचारण्याने आईला सांगितलं की, "शाळेमध्ये खेळताना पडलोय म्हणुन...!" . . आपण नववीत गेलो... एक दिवस तुझी ग्रहपाठाची वही पुर्ण नव्हती, आणि सर तुला छडी मारतील म्हणुन मी ती वही तुला दिली. ती तुझी म्हणुन सरांसमोर सादर केलीस. तुझ्यासाठी मी मार खाल्ला होता कारण माझ्याकडे वही नव्हती; . मार खाल्ला त्याबद्दल काही नाही गं, . पण.. . वही जरा व्यवस्थित उघडुन तरी बघायचीस त्याच्या शेवटच्या पानावर तुला लिहिलेलं "प्रेमपत्र" होतं. पण.. ही वेळही निघुन गेली. . . आपण दहावीत गेलो... वर्षभराच्या मस्तीनंतर जेव्हा सेँडपचा दिवस आला. त्यावेळी तु माझ्यापासुन खुप दुर होणार म्हणुन आधीच मी मनापासुन हेलावुन गेलो होतो. तु समोर आलीस डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी मी मान खाली घातली पण झटकन तु मला तुझ्या मिठीत घेतलंस. मला थोडावेळ काही समजलंच नाही. मी ही तुझ्या मिठीत थोडावेळ विसावलो. . अन तु हळुच रडत रडत माझ्या कानात म्हणालीस "i love u" मी एकदम दचकलोच. मला कळलंच नाही कि हे कधी झालं. . ती म्हणाली, मी सातवीपासुन तुझ्यावर प्रेम करते, पण ते तुला कधीच कळलं नाही. . सांगायचं होतं तुला पण हिंमतच झाली नाही रे! तुझ्या नकाराने, दोस्ती तुटु नये हीच काळजी होती; मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” ..अस म्हणुन तिने एक मोठा पॉझ घेतला. आणि ती तिथेच हमसुन रडायला लागली. . "I Really Miss u.." म्हणुन रडत ती निघुन गेली... . मी फक्त तिच्या त्या धावणार्या सावलीला बघत राहीलो. . माझे डोळे पाण्याने भरले होते. . आपले मार्ग वेगळे होत होते... पण ती जाता जाता आठवणी देवुन गेली.. ! . पण.. . (तो रडत..) जायचंच होतं दुर तर आयुष्यातच का आलीस यार..! सांग ना..?? . "प्रेम होतं तुझं तर एकदा सांगायचं तरी होतंस, मी नाही बोलु शकलो तर काय झालं.?? तु तरी बोलायचं होतंस..!" शेवटच्या क्षणी माञ हातात हात देऊन दुर केलस..!" . पण.. . जाता जाता या वेड्या मनाला आठवणीेच दुःख देउन गेलीस यार तु..!" . आता तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय, काळीज रडतय धडधडतय, पण..तीच ह्रदय मात्र काहीच बोलत नाही..!" . . "कसली गं ही आपली अजब प्रेमकहाणी आहे, ज्यात प्रेम कमी, विरह जास्त आणि डोळ्यांत फक्त पाणी...!"
0 likes
0 shares