Back to feed
V
Vihaan Bhat Love · Marathi · Romantic

गुंतलेल्या जीवाला लागेल काळजात ठेच गुदमरल्या श्वासांचा कसा सोडवावा पेच..? क्षणाक्षणाला फसवी हा मृगजळाचा भास जीवलगाच्या प्रीतीचा करपून जाई घास गाठ बांधल्या मनाची का उसवतात नाती नशिबाच्या शेवटाला नुस्ती मूठभर माती

198 likes 64 shares
WhatsApp