Back to feed
K
Kabir Mehta Spiritual · Marathi · Spiritual

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो, ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,👳 त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो  गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो, ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,🙇 हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो, चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो 🍇🍒 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 🍩यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो, नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,🌊 ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो, ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो🌰 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 🏊धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची, कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची, आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो, मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,👰 नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,💃 तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो, ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो 👩 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,👦 आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,🐃 🐐 बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,😳 मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,😔 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,📃 आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,😳📃 कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,😉 तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,😷 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,🍮 रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,🌾🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌾 दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,🚶 मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,😢 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,👮🙏 कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,👌 नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,👩💧 आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,😍 गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘 ................ 😍😍आवडल तर पुढे पाठवा😍😍

243 likes 81 shares
WhatsApp