घरी आले Wi-Fi… घरी आले Wi-Fi... अन् बायको झाली हाय-फाय... कितीही जोरात आवाज द्या... कानावर काही पडतंच नाय... 👱🏼नवरा - अगं जरा ऐकतेस काय...? 👩🏻बायको - थांबा... मला वेळ नाय... 👱🏼नवरा - एवढी कशात बिझी हाय ? 👩🏻बायको - हे मेले WhatsApp चालतच नाय... 👱🏼नवरा - मी काय म्हणत होतो... 👩🏻बायको - बोला, मी ऐकते हाय... 👱🏼नवरा - मी बाहेर चाललो होतो... काही सामान आणायचे काय ? 👩🏻बायको - किती वेळा सांगू तुम्हाला ? Whats App वर लिस्ट पाठवली हाय... 👱🏼नवरा - पिंट्या अजुन आला नाही... क्लास कधी सुटणार हाय ? 👩🏻बायको - तुम्ही काळजी करू नका... मी त्याचे Status पायलं हाय...! 👱🏼नवरा - एवढं कसलं टेन्शन आलंय ? कोणती वस्तू सापडत नाय ? 👩🏻बायको - वस्तू-बिस्तू खड्यात गेली... कालचा message सापडत नाय... 👱🏼नवरा - आज मला सुट्टी हाय... नाश्ता-पाण्याचा बेत काय ? 👩🏻बायको - Group मधे Video आलाय... तशीच डिश करणार हाय...! 👱🏼नवरा - अगं, तुझी ती मैत्रिण, बऱ्याच दिवसांत दिसली नाय... 👩🏻बायको - तुम्हाला तिच्याशी काम काय ? Whats App वर मी तिच्या टच मधे हाय... 👱🏼नवरा - काय गं, आज-काल माझ्याशी तू हसून-खेळून बोलतच नाय... 👩🏻बायको - प्रॉब्लेम तर तुमचाच हाय... माझे Smiley तुम्ही बघतच नाय...!! 😇😊😇 😂😝😜😛😆😂
180 likes
71 shares