घरी आले Wi-Fi… घरी आले Wi-Fi....... अन् बायको झाली हाय-फाय.... कितीही जोरात आवाज द्या... कानावर काही पडतंच नाय... नवरा - अगं जरा ऐकतेस काय...? बायको - थांबा....मला वेळ नाय... नवरा - एवढी कशात बिझी हाय ? बायको - हे मेले WhatsApp चालतच नाय... नवरा - मी काय म्हणत होतो.... बायको - बोला, मी ऐकते हाय... नवरा - मी बाहेर चाललो होतो... काही सामान आणायचे काय ? बायको - किती वेळा सांगू तुम्हाला ?.... WhatsApp वर लिस्ट पाठवली हाय.... नवरा - पिंट्या अजुन आला नाही... क्लास कधी सुटणार हाय ? बायको - तुम्ही काळजी करू नका... मी Status पाहीलं हाय...! नवरा - एवढं कसलं टेन्शन आलंय ?... कोणती वस्तू सापडत नाय ? बायको - वस्तू-बिस्तू खड्यात गेली... कालचा message सापडत नाय.... नवरा - आज मला सुट्टी हाय... नाश्ता-पाण्याचा बेत काय ? बायको - Group मधे Video आलाय... तशीच डिश करणार हाय...! नवरा - अगं, तुझी ती मैत्रिण, बऱ्याच दिवसांत दिसली नाय.... बायको - तुम्हाला तिच्याशी काम काय ? WhatsApp वर मी तिच्या टच मधे हाय... नवरा - काय गं, आज-काल माझ्याशी तू हसून-खेळून बोलतच नाय... बायको - प्रॉब्लेम तर तुमचाच हाय. .. माझे smiley तुम्ही बघतच नाय...!! 👍👌👌👌😊
253 likes
70 shares