☆. . घरापासून सहा किमी दूर असलेल्या एका कारखान्यात बबन कामाला होता. तो रोज बसने ये जा करत असे. ते त्रासाचे होऊ लागले म्हणून त्याने सायकल घेतली. दुसर्या दिवशी ऐटीत सायकल चालवीत कामावर जात असताना बसस्टॉपवर नेहमीचे मित्र दिसले... . . . " काय बबन..? नवी सायकल का..? चहा पाहिजे बुवा..." मित्र म्हणाले. हॉटेल समोरच होते. सगळे चहा प्यायला गेले. बोलता बोलता बराच वेळ गेला... . . " बस आली... बस आली.." एकजण ओरडला. सगळेजण पळत निघाले. बबनही सवयी प्रमाणे बसमध्ये चढला. तिकिट काढताना लक्षात आले की सायकल हॉटेलपाशीच राहिली. काळजात धस्स झाले. पुढच्याच स्टॉपला उतरला. मागे फिरला आणि झपाझप पावले टाकत चालू लागला... . . वाटेत एक गणपती मंदिर होते. तिथे चप्पल काढून नमस्कार करीत नवस बोलला... " देवा माझी सायकल मला मिळू दे. तुला पेढे ठेवीन..." झपाझप चालत हॉटेलपाशी आला. सायकल लावली होती तिथे तशीच होती. जीव भांड्यात पडला. " गणपती पावला..." असे म्हणत आनंदाने शेजारच्या दुकानातून पेढे घेतले आणि सायकलवरून मंदिराकडे निघाला... . . . गणपती मंदिराजवळ आला. देवळाजवळ सायकल लावली. आत जाऊन देवापुढे पेढे ठेवले. भक्तिभावाने डोके टेकून नमस्कार केला. तिथल्या लोकांना आनंदाने पेढे वाटले. गणपती नवसाला पावल्याचे सांगितले आणि देवळाबाहेर येऊन पाहातो तो काय...? . . . देवाच्या दारात लावलेली नवी सायकल चोरीला गेली होती...😂😂😂 . . ● डॉ. शरद अभ्यंकर (वाई) यांच्या " जरा शहाणे होऊ " या पुस्तकातील एक किस्सा...
43 likes
13 shares