Back to feed
V
Vivaan Chauhan Spiritual · Marathi · Spiritual

*चिंतनिय काही🌹* जर जंगलाचा विचार केला तर... 1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे? उत्तर - हत्ती 2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे? उत्तर - जिराफ 3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे? उत्तर - कोल्हा 4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे? उत्तर - चित्ता असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही *क्वालिटी* नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं....❓❓ सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त *जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत* प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो. आपण *वेगवान* नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात *स्मार्ट* नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण *बुद्धिवान* नसलो तरी काही फरक पडत नाही. मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे *धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती* असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र *विश्वास* तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या *प्रयत्नांवर* विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.....🙏

208 likes 29 shares
WhatsApp