Back to feed
R
Rudra Yadav Love · Marathi · Romantic

चंदनासम देह झुरतो - गंध परिमळतो कुठे ? विरह हृदयी ग्रीष्म बनला तो तुला कळतो कुठे ! कोवळी किरणे बघाया रात आसुसते कुठे रातराणीच्या सुगंधा दिवस व्याकुळतो कुठे ! तव स्मृतींचे शब्द बनले अन् विरहीणी ही जाहली पण तरी राधेस येथे कृष्ण हा मिळतो कुठे ? दूर जाता पूर येतो आसवांचा या मनी पण सख्या ह्या पापण्यांचा बांध ढासळतो कुठे ????

44 likes 27 shares
WhatsApp