Back to feed
K
Kunal Bhat Love · Marathi · Romantic

चंद्र तारका नि तूं दूर चंद्र तो तिथे तशीच उभी यामिनी मंद निल प्रीत झरे वरून या नभातूनी घन दाट कुंतलात तूं माळलास मोगरा सहवास तुझा धुंद इथे घेई मी न्हावूनी हसत मुखी चंद्रकोर मोहिनी मना वरी तुच सखे आज इथे धुंद धुंद वारूणी पैठणीस चांदण्या कुठूनी आणल्या गडे ! आभाळ पांघराय मी तुच होय यामिनी वल्लरीतला झरा पायी तुझ्या पैंजणे शब्द शब्द त्यात कवन आणि राग रागिणी छेड छेड तार सखे ह्रदय विणा घेऊनी सूर लाव सप्तमात प्रीत राग गायनी कधीच ना सरोच ही रात्र मोहरातली चंद्र तारका नि तूं हव्या हव्या जीवनी

47 likes 36 shares
WhatsApp