छंद तुझा लागला या मनाला कसा आवरू मी मला .... हृदयात या तूच बसली डोळ्यातही या तूच दिसली... पाहता मन तुझ्यात अडकते लाजून हृदय हळूवार धडकते.. वाट ही बनली तुझ्या दीशेने व्याकूळ मन हे तुझ्या आशेने ... स्पर्शाची मज आस लागली भास ही सारी होऊ लागली ... हात तूझे मी हाती घ्यावे सदैव तूझीया संग रहावे... चांद मातूनी पून्हा हा यावा हात तूझा मज हाती असावा...
0 likes
0 shares