Back to feed
R
Riya Patel Love · Marathi · Romantic

*छान कविता* *|| फक्त तू खचू नकोस ||* एक डाव हरला तरी त्यात काय एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड ... संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* सूर्य रोजच उगवतो, त्याच नव्या तेजाने ... रोज मावळतीला जातो रोजच्याच् नेमाने ... येणे जाणे रितच् इथली, हे तू विसरु नकोस ... *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* प्रेम तुझ्यावर करणारे , कितीतरी लोक आहेत ... तुझ्यासाठी जोडणारे , खुप सारे हात आहेत ... अरे अशाच आपल्यांसाठी , तू ही थोड हसुन बघ ... *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* वाट तुझी बघत असतं, रोजच कुणीतरी ... तुझ्यासाठी जगत असतं , आस लावून प्रत्येक क्षणी ... त्यांच्यासाठी तुलाही जगायचे, अश्रु तू गाळु नकोस ... *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* उठ आणि उघडून डोळे , पहा जरा जगाकडे ... प्रत्येकाच्या आयुष्यात , काहीतरी असतेच् थोडे ... नाही नाही म्हणून , उगाच कुढत तू बसु नकोस ... *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ... परिस्थितीशी भिडवून छाती, दोन हात करत चल ... विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघु नकोस ... *आयुष्य खुप सुंदर आहे,* *फक्त तू खचु नकोस...* *|| फक्त तू खचू नकोस ||*

188 likes 19 shares
WhatsApp